(म्हणे) ‘लैंगिक स्वातंत्र्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले !’ – माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे)

  • स्वैराचाराला बळी पडणारे ख्रिस्ती धर्मगुरु इतरांना प्रेम, शांती आणि नैतिकता यांचे पाठ पढवतात ! एकंदरीत सद्यस्थिती पहाता ख्रिस्ती चर्च म्हणजे ‘लैंगिक शोषणाचे केंद्र’ आणि पाद्री म्हणजे ‘वासनांध व्यक्ती’ असेच चित्र आता जगभरात निर्माण झाले आहे, असे दिसून येते !
  • माजी पोप बेनेडिक्ट यांनी यापूर्वी हे का सांगितले नाही ? आणि ते रोखण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत ? हेही त्यांनी सांगायला हवे !
  • ख्रिस्ती मिशनरींची ही सत्यस्थिती भारतातील प्रसारमाध्यमे, ख्रिस्तीप्रेमी आणि तथाकथित निधर्मीवादी दडपतात, हे लक्षात घ्या !

बर्लिन – १९६० च्या दशकात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार झाला. त्यामुळे वातावरण बिघडले आणि त्यातूनच ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले, असे विधान माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी केले आहे. ‘१९८० च्या दशकापर्यंत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण फारसे नव्हते; पण नंतर ते वाढले. ही स्थिती ईश्‍वराच्या अनुपस्थितीमुळे उद्भवली’, असेही ते म्हणाले. जर्मन कॅथलीक नियतकालिक ‘क्लेरूसब्लाट’ने पोप यांचे ५ सहस्र ५०० शब्दांचे पत्र छापले आहे. त्यात त्यांनी वरील मत मांडले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लहान मुले आणि महिला यांच्यावर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पत्रात त्या घटना का घडल्या, याची कारणे माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी दिली आहे.

बेनेडिक्ट यांनी वर्ष २०१३ मध्ये त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले होते. पोपच्या ६०० वर्षांच्या परंपरेत ते त्यागपत्र देणारे पहिलेच पोप आहेत. त्यांच्यानंतर फ्रान्सिस हे पोप बनले. बेनेडिक्ट यांनी त्यांच्या पत्रात पोप फ्रान्सिस यांचे आभार मानले आहेत.

माजी पोप बेनेडिक्ट यांनी या पत्रात म्हटले आहे की,

१. वर्ष १९६० नंतर समाजात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार वाढला. लैंगिक स्वातंत्र्याच्याच पुरस्कारामुळे कॅथलीक परंपरा भ्रष्ट झाली आणि या परंपरेत समलैंगिकतेचा शिरकाव झाला.

२. येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालणे आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणे हाच लैंगिक अत्याचाराच्या समस्येवरील एकमेव उपाय आहे.

३. पूर्वीच्या काळात लैंगिकतेविषयी असलेल्या मान्य संकेतांचा र्‍हास झाला. नैतिक पातळी पूर्णपणे घसरल्यामुळे लैंगिक स्वैराचाराला चालना मिळाली आणि त्यातून विविध ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. वर्ष २०१८ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की, लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी मी योग्य वेळी पावले उचलली नाहीत. मी लहान मुलांना टाकून दिल्याप्रमाणे वागलो. (असे नुसते सांगून काय उपयोग ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF