बंगालमध्ये रामनवमीनिमित्त फेरी काढण्यास विहिंपला अनुमती नाकारली !

  • बंगालमध्ये हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसची मोगलाई ! बंगालमध्ये ईदमुळे नवरात्रीत दुर्गामातेची मिरवणूक काढण्यासही अनुमती नाकारली होती, हे लक्षात घ्या !
  • हिंदूंना आणि त्यांच्या धार्मिक सणांना विरोध करणार्‍या तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनाच पुरोगामी अन् निधर्मीवादी म्हटले जाते !

कोलकाता – पोलिसांनी रामनवमीच्या निमित्ताने विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना दुचाकी फेरी काढण्यास अनुमती नाकारली. (बंगालमधील पोलीस हे तृणमूल काँग्रेस सरकारच्या ताटाखालची मांजरे बनली आहेत ! त्यामुळे ते हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात आणि धर्मांधांना मोकळीक देतात ! – संपादक) ही फेरी चालू होण्याच्या काही वेळापूर्वीच ही अनुमती नाकारण्यात आली. याचा विरोध म्हणून विहिंपच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे आणि श्रीरामाची प्रतिमा घेऊन फेरी काढण्याचा प्रयत्न केला.

विहिंपकडून रामनवमीच्या निमित्ताने दक्षिण बंगालमध्ये लहान-मोठ्या ७०० फेर्‍या काढण्याची योजना होती.


Multi Language |Offline reading | PDF