भोपाळ येथील काँग्रेस भवनाची भूमी तेथील राममंदिराला देण्याची काँग्रेसचे हिंदुद्वेषी नेते दिग्विजय सिंह यांची घोषणा

  • अयोध्येतील राममंदिराची भूमी हिंदूंना मिळण्यासाठी आणि तेथे भव्य राममंदिर बांधण्यासाठी दिग्विजय सिंह आणि त्यांचा पक्ष यांनी का प्रयत्न केले नाहीत ? आताही ते याला विरोध का करत आहेत, हेही त्यांनी सांगायला हवे !
  • मध्यप्रदेशातील राममंदिरासाठी जागा देण्याची भाषा करणारे दिग्विजय सिंह यांनी भोजशाळेत हिंदूंना पूजा करण्यासाठी मज्जाव केला होता! हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यामध्ये ज्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती, त्यांत सिंह हे वरच्या क्रमांकावर होते. आता हिंदूंना खुश करून त्यांची मते मिळवण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

भोपाळ – येथील हमीदिया मार्गावरील राममंदिराच्या समोर असलेली भूमी राममंदिरासाठी देण्याची घोषणा काँग्रेसचे नेते आणि येथील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी केली. ते राममंदिरात दर्शनासाठी आल्यावर बोलत होते. ‘ही भूमी जिल्हा काँग्रेसच्या नावावर आहे. सध्याचे राममंदिर काँग्रेसच्या काळातच बांधण्यात आले होते. त्याच्या समोरची भूमी काँग्रेस भवनासाठी देण्यात आली होती. आता ती राममंदिरासाठी देण्यात येणार आहे’, असे सिंह यांनी सांगितले.

भाजपचे राज्य प्रवक्ते रजनीश अग्रवाल म्हणाले की, निवडणूक आल्यावर दिग्विजय सिंह यांना हिंदुत्व आठवले आहे. हा भाजपचाच परिणाम आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now