गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून डोंबिवली आणि अन्य एक शहर येथील साधकांची चौकशी !

  • कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा चौकशीचा वाढता ससेमिरा !
  • जिहादी आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना छळणारे हिंदुद्वेषी पोलीस हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करतात !
  • राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक छळणारे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

१. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी डोंबिवली येथील सनातनचे साधक अजय संभूस यांची गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस बाबरे यांच्याकडून चौकशी !

‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी ९ एप्रिल २०१९ या दिवशी डोंबिवली येथील सनातनचे साधक श्री. अजय संभूस यांची गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राईम ब्रांचचे) पोलीस बाबर आणि अन्य एक पोलीस यांनी चौकशी केली.

श्री. संभूस यांच्या घराला कुलूप असल्यामुळे पोलिसांनी श्री. संभूस यांच्या शेजारी रहाणार्‍या त्यांच्या नातेवाइकांकडून श्री. संभूस यांचा भ्रमणभाष क्रमांक मागितला. त्यानंतर पोलिसांनी श्री. संभूस यांना भ्रमणभाषवर संपर्क करून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातून बोलत असल्याचे सांगून भेट घ्यायची असल्याचे सांगितले. या वेळी श्री. संभूस बाहेर असल्याने पोलिसांनी दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. या वेळी पोलिसांनी श्री. संभूस यांना अन्य एका साधकाचे नाव घेऊन त्यांनाही भेटायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘भेटण्यासाठी येतो’, असे सांगितले. त्यावर श्री. संभूस यांनी ‘काय काम आहे ?’, असे विचारले असता पोलिसांनी ‘गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे’, असे सांगितले आणि दूरभाष ठेवून दिला.’

(श्री. अजय संभूस आणि अन्य एका साधकाची ११.४.२०१९ या दिवशी पोलिसांनी केलेल्या चौकशीचा वृत्तांत लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

२. एका शहरातील सनातनच्या साधिकेची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेली चौकशी !

‘९ एप्रिल २०१९ या दिवशी गुन्हे अन्वेषण शाखेच्या २ पोलिसांनी एका शहरातील साधिकेकडे तिच्या मुलीविषयी चौकशी केली. या साधिकेची मुलगीही सनातनच्या एका आश्रमात राहून साधना करते. या वेळी पोलिसांनी साधिकेकडे तिच्या मुलीचे नाव, वय, शिक्षण, नोकरी, रहाण्याचे ठिकाण, घरी किती दिवसांनी येते ? तिचा विवाह झाला का ? आदी माहिती, तसेच घरातील अन्य व्यक्तींची माहिती विचारली. साधिकेच्या आईने ही सर्व माहिती पोलिसांना दिली. या वेळी पोलिसांनी साधिकेकडे केलेल्या चौकशीचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

पोलीस : तुमची मुलगी काय करते ?

साधिका : सनातन संस्था अध्यात्मावर अनेक ग्रंथ प्रकाशित करते. तेथे ती सेवा करते.

साधिका : ही सर्व माहिती तुम्ही का घेत आहात ?

पोलीस : आम्ही फक्त सनातनच नव्हे, तर सर्वच संस्थांच्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करतो. आम्हाला माहिती आहे की, सनातन संस्था अध्यात्माचेच कार्य करते.

साधिका : पूर्वीही अशाच तुमच्यासारख्या दोन व्यक्ती येऊन चौकशी करून गेल्या होत्या. आम्ही वयस्कर आहोत. तुम्ही येथे चौकशीला का येता ? आम्हाला त्रास होतो. (तीच तीच माहिती घेण्याच्या निमित्ताने सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक त्रास देणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? – संपादक)

पोलीस : आम्हाला वरून (वरिष्ठांकडून) सगळ्या संस्थांची माहिती काढण्यास सांगण्यात आले आहे; म्हणून चौकशी करत आहोत. आमच्या कामाचा तो भाग आहे. तुमच्या घरी शांत आणि चांगले वाटत आहे. (असे सांगून पोलीस निघून गेले.)’

३. एका शहरातील एका साधकाची पोलिसांनी केलेली चौकशी

‘९ एप्रिल २०१९ या दिवशी पोलिसांनी ‘सनातन संस्थेची चौकशी करायची आहे’, असे सांगून एका शहरातील एका साधकाची चौकशी केली. या वेळी साधकांनी पोलिसांचे ओळखपत्र पाहून त्यांना माहिती दिली. चौकशीच्या वेळी पोलिसांनी साधकाचे नाव, नोकरी, घरातील अन्य व्यक्तींचे शिक्षण, नोकरी आदी माहिती विचारून घेतली. या वेळी पोलिसांनी साधकांच्या घरातील दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक चाळला. १५ मिनिटे चौकशी करून पोलीस निघून गेले.’

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांकडून वारंवार साधक आणि कार्यकर्ते यांची चौकशी करण्यात येत आहे अन् चौकशीच्या नावाखाली त्यांचा नाहक छळ केला जात आहे. साधक आणि कार्यकर्ते यांनी हा चौकशीचा वृत्तांत त्वरित ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयात पाठवावा.’

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. ‘कर नाही, त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.


Multi Language |Offline reading | PDF