सनातन प्रभातचे संपादक असतांना राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी पत्रकारिता कशी करावी ?, हे शिकवून संपादकीय विभागातील साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. भूषण केरकर

१. समाजाला आध्यात्मिक स्तरावर घडवण्यासाठी काय आवश्यक आहे, याची दिशा देणारी सनातन प्रभातची पत्रकारिता !

सध्या देशभरात वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांची संख्या पुष्कळ आहे. या प्रसारमाध्यमांसाठी काम करणारे बहुतांश वार्ताहर आणि संपादक यांनी पत्रकारितेचे विशेष शिक्षणही घेतलेले असते; मात्र असे असूनही ही पत्रकारिता आतापर्यंत जनतेच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण करू शकली नाही किंवा समाजाला साधनेकडेही वळवू शकली नाही. यावरून या पत्रकारितेचे एकूण स्वरूप पाहिले, तर कोणती बातमी छापली, तर वृत्तपत्राचे वितरण वाढेल, हितसंबंध कसे जपले जातील, याचाच प्राधान्याने विचार केला जातो, हे लक्षात येते; मात्र सनातन प्रभातचे तंत्रच आगळे आहे. धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत असणारी अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असणारी सनातन प्रभात नियतकालिके आज व्यापक स्तरावर कार्य करत आहेत, ती केवळ या नियतकालिकांचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आणि त्यांनी संपादकपदी असतांना समाजमन जागृत करण्यासाठी बातम्यांना दृष्टीकोनात्मक दिलेल्या दृष्टीकोनांमुळेच होय. समाजाला काय आवडते, यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे, हे जाणून त्याप्रमाणे त्याला आध्यात्मिक स्तरावर दिशा देण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या नियतकालिकांच्या माध्यमातून आरंभापासूनच केले आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणली.

२. सनातन प्रभातच्या वाचनाने हिंदूंमध्ये जागृती होऊन ते धर्माचरण करू लागणे, हेच सनातन प्रभातच्या पत्रकारितेचे गेल्या २० वर्षांच्या व्यापक कार्याचे फलित !

सत्त्वगुणाधिष्ठित राष्ट्ररचनेच्या, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाने कार्य करणार्‍या सनातन प्रभातचे वार्ताहर किंवा संपादक यांनी पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांनाही ते राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने विविध विषयांचा अभ्यास करून, तसेच प्रतिदिन घडणार्‍या घडामोडींवर वृत्त बनवून ती अभ्यासपूर्ण रितीने मांडतात. त्याचा सकारात्मक परिणामही समाजात मोठ्या प्रमाणात होत आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित बातम्यांना योग्य दृष्टीकोन कसे द्यायचे आणि त्या माध्यमातून समाजमन कसे घडवायचे, याचे सर्व ज्ञान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संपादकीय विभागातील साधकांना आरंभापासूनच, म्हणजे वर्ष १९९८ पासूनच दिले. त्यामुळे साधकांनाही दिशा मिळाली आणि त्यांना गुरुदेवांच्या कृपेने पुढे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विविध घटनांवर अनेक दृष्टीकोन सुचत गेले. हे दृष्टीकोन परात्पर गुरु डॉ. आठवले हेच सूक्ष्मातून आम्हाला सुचवतात, असाच सर्वांचा भाव असतो. प्रत्यक्षात ते या कार्यातून स्थुलातून मुक्त झाले असले, तरीही त्यांचे सूक्ष्मातून मार्गदर्शन सदैव मिळतच असते, असे साधकांना जाणवते. टिपण्या लिहिण्याच्या सेवेतून मी मुक्त झालो आहे, असे गुरुदेवांनी सांगणे, म्हणजे त्यांच्या केवळ सूक्ष्मातील अस्तित्वानेच सर्व कार्य घडत रहाणार, असाच सर्वांचा भाव आहे.

परात्पर गुरुदेवांनी चालू केलेल्या सनातन प्रभातला ईश्‍वर आणि संत यांचे आशीर्वाद लाभलेले असल्यामुळे ते चैतन्यमय बनले आहे. या चैतन्याचा परिणाम म्हणजे सनातन प्रभातच्या वाचनाने हिंदूंमध्ये जागृती होऊन ते धर्माचरण करू लागले आहेत, तसेच संघटित होऊन हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्यासह अन्य समविचारी संघटनांच्या धर्मकार्यात सहभागी होत आहेत. हेच सनातन प्रभातच्या पत्रकारितेचे गेल्या २० वर्षांच्या व्यापक कार्याचे फलित आहे. यासाठी आम्ही सर्व साधक परात्पर गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.

– श्री. भूषण केरकर, सहसंपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह (९.४.२०१९)

राष्ट्र आणि धर्म यांची दु:स्थिती दर्शवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे परखड दृष्टीकोन !

  • हिंदूंना आतंकवादी ठरवणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे काश्मीरमधील देशद्रोही धर्मांधांविषयी ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • जगात देशद्रोही कृत्ये करणार्‍यांना फाशी होते, तर भारतात सत्ताप्राप्ती होते ! असे राष्ट्रद्रोही राजकारणी देऊन जगभर देशाची नाचक्की करणारी लोकशाही काय कामाची ? हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • सहस्रो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार्‍या शासनकर्त्यांना ते सत्तेत असलेल्या राज्यांमधील विकासकामांसाठी मंदिरांच्या दानपात्रातील निधी का लागतो ? मंदिरांच्या निधीची लूट करण्याऐवजी शासनकर्ते स्वतःला मिळणारे उत्पन्न विकासकामांवर का व्यय करत नाही ?

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने संपादकीय विभागातील सर्व साधकांना शिकायला मिळालेल्या संपादकीय दृष्टीकोनांच्या, म्हणजेच टिपण्यांच्या आधारे यापुढेही अशीच पत्रकारिता घडू दे आणि त्या माध्यमातून समाजात जागृती होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे, तसेच या सेवेच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांचीही जलद आध्यात्मिक उन्नती होऊ दे, हीच परात्पर गुरुदेवांच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे !


Multi Language |Offline reading | PDF