भाजपच्या काश्मीरमधील मुसलमान उमेदवाराचा कलम ३७० आणि ३५ अ रहित करण्याला विरोध

देशातील अन्य भागातील मते मिळवण्यासाठी भाजप ही कलमे रहित करण्याचे आश्‍वासन देत असल्याचे उमेदवाराचे विधान !

  • भाजपकडून मिझोराम आणि गोवा येथे गोमांसाचे, तर काश्मीरमध्ये राष्ट्रघातकी कलमांचे समर्थन होते, हेच भाजपचे खरे स्वरूप होय !
  • केवळ मते मिळवण्यासाठी भाजप हिंदूंना मूर्ख बनवतो, हे लक्षात घ्या !
  • गेली ५ वर्ष सत्तेत असतांना भाजपने आश्‍वासन देऊनही ही कलमे काढली नाहीत, यामागील कारण आता समोर आले आहे ! आता परत भाजप सत्तेत आल्यावरही तो ही कलमे काढणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
भाजपचे बारामुल्ला मतदारसंघातील उमेदवार महंमद मकबूल वार

नवी देहली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी घोषित केेलेल्या संकल्पपत्रात काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम ३७० आणि कलम ३५ अ (या कलमानुसार काश्मीरमध्ये काश्मिरींव्यतिरिक्त अन्य नागरिक तेथे भूमी खरेदी करू शकत नाहीत.) रहित करण्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा दिले असले, तरी याच काश्मीरमधील भाजपचे बारामुल्ला मतदारसंघातील उमेदवार महंमद मकबूल वार यांनी ही कलमे रहित करण्यास विरोध केला आहे.

वार यांनी त्यांचे स्वतंत्र घोषणापत्र प्रकाशित करून विकासाला प्राधान्य दिले आहे. महंमद वार यांनी म्हटले आहे की, माझ्या पक्षाला अशी आश्‍वासने द्यावी लागतात; कारण देशातील अन्य भागातील मते मिळाली पाहिजेत; मात्र काश्मीरमधून ही कलमे कधीही काढली जाऊ शकत नाहीत. (अशांना उमेदवारी देणारा भाजप हिंदूहित काय साधणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now