नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार

भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या आपत्तींमध्ये तिसर्‍या महायुद्धाचीही भर पडेल. आपत्काळात रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध करत आहे. या सर्व ग्रंथांची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी प्रस्तुत सदरात ग्रंथांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

ताप, बद्धकोष्ठता आदी ८० हून अधिक विकारांवर उपयुक्त !

(पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण संकटकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !)

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

ग्रंथाचे मनोगत

प्रत्येकालाच आपण सदा निरोगी आणि आनंदी रहावे, असे वाटत असते; परंतु आजकाल निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे. प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. याऐवजी ‘बिंदूदाबन उपचारपद्धत’ अवलंबली, तर आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह विकारावर मूलगामी उपचार होण्यासही साहाय्य होते. बहुतेकांना ‘बिंदूदाबन उपचारपद्धत ही चीनमधून आलेली आहे’, असे वाटत असते; परंतु प्रत्यक्षात तिचा उगम हिंदुस्थानातच झालेला आहे. या शास्त्राची तोंडओळख सनातनचा ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’ यात दिली आहे.

प्रस्तुत ग्रंथात डोकेदुखी, ताप आदी नेहमीच्या ८० हून अधिक विकारांवर उपचार कसे करावेत, याचे मार्गदर्शन केले आहे. याव्यतिरिक्त निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन दाबावयाचे बिंदूही या ग्रंथात सांगितले आहेत. बिंदूदाबन उपचारांसाठी मार्गदर्शक अशा महत्त्वाच्या सूचनाही आरंभी दिल्या आहेत. या सूचना समजून घेऊन बिंदूदाबन उपचार करणे आवश्यक आहे.

जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारणे असतात. भूत, पिशाच यांसारख्या वाईट शक्तींचा त्रास, हे प्रधान आध्यात्मिक कारण होय. वाईट शक्तींनी आपली स्थाने मनुष्याच्या शरिरात निर्माण केलेली असल्यामुळे बिंदूदाबन उपचार करतांना त्या स्थानांवरच प्रहार होतो. याला प्रत्युत्तर म्हणून वाईट शक्तीही उपचार करणार्‍यावर आक्रमण (हल्ला) करण्याची  शक्यता असते. भावपूर्ण प्रार्थना करून एकाग्रतेने नामजप करत बिंदूदाबन उपचार करणे, हा त्यावरील मार्ग आहे.

‘या ग्रंथाच्या अभ्यासाने प्रत्येकाला नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार करून निरोगी जीवन जगता येवो’, ही आरोग्यदेवता भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना ! – संकलक

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाइन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !

स्थानिक वितरकाचा संपर्क  : ९३२२३१५३१७

विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now