मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे बुरखाधारी महिलांची पडताळणी न केल्याने बनावट मतदान झाले ! – भाजप उमेदवाराचा आरोप

बुरख्यामागील तोंडवळा न पडताळता मतदान का करू देण्यात येते ? यातून बनावट मतदान होणार नाही, याची शाश्‍वती निवडणूक आयोग देणार आहे का ?

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – ११ एप्रिल या दिवशी देशभरात ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. काही ठिकाणी मतदानाच्या वेळी अनुचित घटना घडल्याच्या तक्रारी आल्या. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरचे भाजपचे उमेदवार संजीव बालियान यांनी ‘माझ्या मतदारसंघात बुरखाधारी महिलांची पडताळणी न करताच त्यांना मतदानासाठी मतदानकेंद्रात पाठवले जात असल्यामुळे बनावट मतदान होत आहे’, असा आरोप केला. ‘जर हा प्रकार थांबवला गेला नाही, तर मी येथे पुन्हा मतदानाची मागणी करीन’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

शामली येथे सुरक्षादलांचा हवेत गोळीबार

उत्तरप्रदेशातील शामली येथे मतदान ओळखपत्राविना मतदान करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केल्यावर त्यांना विरोध करण्यात आला; मात्र त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यावर येथे तैनात असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.


Multi Language |Offline reading | PDF