बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त होण्याचे असेही एक कारण !

‘अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या संदर्भात चर्चा विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि अखिल भारतीय बाबरी मशिद कृती समिती (बाबरी समिती) यामध्ये झाल्या; पण त्या चर्चा विफल झाल्या आणि वादावर तोडगा निघाला नाही. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या काळात एक गोष्ट मान्य करून घेतली की, दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष पुरावे दाखवावेत; म्हणजे या चर्चेत प्रगती होईल. दोघांनी कागदपत्रे आणि लेखी युक्तीवाद देऊन चर्चा चालू केली. बाबरी समितीला साम्यवादी इतिहासकारांचा कंपू साहाय्य करत होता. साहाय्य नाही, खरे तर तो कंपूच चर्चा चालवत होता. हा कंपू भारत इतिहास संशोधन संस्थेचे सहकारी कार्यालय आणि येथील सुविधा वापरून बाबरी समितीची कागदपत्रे सिद्ध करत होता. त्यामुळेच त्या संस्थेच्या सदस्य सचिवाने त्यागपत्र दिले होते.

बाबरी समितीने दिलेले पुरावे हे पुरावेच नव्हते, तर बालीश विधानांची चवड रचून दिली जाई. त्याचे नमुने असे, ‘राम हा इजिप्तचा राजा होता. त्याचा जन्म अफगाणिस्थानमध्ये झाला’, इत्यादी.

विहिंपने मात्र कष्टपूर्वक पुराणवस्तू संशोधनातून, ऐतिहासिक साधनातून, वाङ्मयीन स्रोतामधून अनेक पुरावे पुढे ठेवले होते; पण त्यामुळेच त्या चर्चा संपुष्टात आल्या. ज्या वेळी विहिंपने दाखल केलेल्या पुराव्यांना तोडीस तोड पुरावे आपण देऊ शकत नाही, असे लक्षात आले, तेव्हा साम्यवादी इतिहासकार आणि बाबरी समितीचे प्रतिनिधी यांनी बैठकीस येण्याचे बंद केले. या चर्चेतून त्यांनी माघार घेणे, चंद्रशेखर यांनी चालू केलेल्या चर्चा संपुष्टात येणे यासह इतर कारणांमुळे रामजन्मभूमी चळवळीने वेगळे वळण घेतले आणि त्याचा शेवट ढाचा उद्ध्वस्त होण्यात झाला.’

– अरुण शौरी, माजी केंद्रीय मंत्री तथा पत्रकार (इंडियन एक्स्प्रेस, १८ आणि १९ मार्च २००२)
(अनुवाद : स.वा. आगाशे (संदर्भ : मासिक ‘विवेक’, ७.४.२००२))


Multi Language |Offline reading | PDF