बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त होण्यातील काही घटनाक्रम

२५ सप्टेंबर १९९० : भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा चालू. या रथयात्रेत ‘कसम राम की खाते हैं, मंदिर वहीं बनाएंगे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. करसेवा रोखण्यासाठी मुलायम सिंहांकडून कडक उपाय आणि पंचकोसी, तसेच चौदाकोसी परिक्रमांवर बंदी

२४ ऑक्टोबर १९९० : उत्तरप्रदेशात कारसेवकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड. नंतर ३० ऑक्टोबरपर्यंत ४ लाख कारसेवकांना अटक. तरीही ८५ सहस्र कारसेवक अयोध्येत दाखल

३० ऑक्टोबर १९९० : बाबरी ढाच्यावर कारसेवकांची मुसंडी. मशिदीच्या घुमटावर भगव्या ध्वजाचे आरोहण

२ नोव्हेंबर १९९० : अयोध्येत आलेल्या लक्षावधी कारसेवकांवर तत्कालीन मुख्यमंत्री मुल्ला मुलायम सिंह यादव यांनी गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते. या गोळीबारात १८ हून अधिक कारसेवक ठार झाले. त्यामध्ये कोलकाता येथून आलेले कोठारी बंधू होते. ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात आकडा अधिक होता. काही कारसेवकांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली होती.

११ नोव्हेंबर १९९० : अयोध्या आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णय. हुतात्म्यांच्या अस्थिकलशाच्या देशभर यात्रा

३१ ऑक्टोबर १९९१ : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बाबरी मशिदीवर चढाई. तीनही घुमटावर भगव्या ध्वजाचे आरोहण

६ डिसेंबर १९९२ : अयोध्येत अडीच लाख कारसेवक दाखल, नियोजित मुहूर्ताआधीच सहस्रो कारसेवक वादग्रस्त वास्तूत दाखल, वादग्रस्त वास्तू उद्ध्वस्त.

(‘साप्ताहिक राष्ट्रपर्व’, २०.९.२०१० आणि अन्य)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now