हिंदूंनो, श्रीरामाचा आदर्श अनुसरून श्रीरामनवमी खर्‍या अर्थाने साजरी करा !

 . . . यासाठीच हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हा !

पू. संदीप आळशी

‘आज अनेक युरोपीय देशांत रामायणाची कथा शिकवली जाते आणि या कथेचा नायक असलेल्या श्रीरामाचा आदर्श अभ्यासला जातो. याचे कारण म्हणजे, ‘श्रीरामाच्या चरित्राचे सार अंगीकारणे म्हणजे राष्ट्रीय चारित्र्याची जोपासना करणे’, हे त्यांना ठाऊक आहे. युरोपीय देशांना जे समजते, ते भारतीय राज्यकर्त्यांना का समजत नाही ? अर्थात् ज्या भूमीवर श्रीराम जन्मला, त्या भूमीवर श्रीरामाचे मंदिरही एवढ्या वर्षांत उभारू न शकणार्‍या राज्यकर्त्यांकडून बाकीच्या गोष्टींची अपेक्षा तरी काय करणार ? भावी हिंदु राष्ट्रात मात्र श्रीरामाचे चरित्र शालेय जीवनापासूनच शिकवण्यात येईल, तसेच या चरित्राच्या आधारशिलेवरच राज्यव्यवस्थेची जडणघडणही करण्यात येईल. यामुळे हिंदु राष्ट्र हे रामराज्यासारखेच आदर्श असेल. यासाठीच हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हा !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२१.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF