आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची अनुमती चौकीदाराने दिली आहे ! – नरेंद्र मोदी

आतंकवाद्यांना घरात घुसून मारूनही त्यांची आक्रमणे जराही अल्प झालेली नाहीत. प्रतिदिन काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे चालू आहेत, प्रतिदिन सैनिक हुतात्मा होत आहेत. त्यामुळे प्रतिदिन आतंकवाद्यांना मारत बसण्यापेक्षा त्यांचा निर्माता असलेल्या पाकलाच संपवण्याचे धाडस आता सरकारने दाखवायला हवे !

नगर – पूर्वी सतत बॉम्बस्फोट होत होते. त्यात सामान्य लोक मारले जात होते. आता त्यांना ठाऊक आहे की, ते पाताळात लपले, तरी चौकीदार त्यांना शोधून काढेल. चौकीदाराने सैनिकांना आतंकवाद्यांच्या घरात घुसून मारण्याची अनुमती दिली आहे. आधीचे सरकार कमकुवत होते. आताचे सरकार प्रतिशोध घेण्याची मागणी करते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर येथील सभेत केले आणि सैनिकांच्या शौर्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले.

काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना निवडून देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या वेळी मोदी यांनी श्रीरामनवमीच्या मराठीतून शुभेच्छा देत भाषणाला आरंभ केला. (राममंदिरासाठी गेल्या ५ वर्षांत प्रयत्न झाले असते, तर त्या हिंदु जनतेला खर्‍या शुभेच्छा ठरल्या असत्या ! – संपादक)

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. तेे जम्मू-काश्मीरला वेगळे करण्याची भाषा करणार्‍यांसमवेत आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवाद गेला कुठे ? केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव ‘राष्ट्रवादी’ ठेवले का ? तुम्ही देशाच्या नावाने काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असतांना तुम्ही कधीपर्यंत गप्प रहाणार ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनही तुम्हाला झोप कशी येते ?’, अशा शब्दांत पुन्हा एकदा पंतप्रधानांनी शरद पवारांना लक्ष्य केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now