(म्हणे) ‘भारत आणि पाक यांना पुढे जाण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

  • भारताने सैनिकी कारवाई करू नये, यासाठी आधी इम्रान खान आणि आता त्यांचे परराष्ट्रमंत्री अशा प्रकारची विधाने करून भारताला कारवाईपासून परावृत्त करत आहेत !
  • ‘भारताने चर्चा करावी आणि आम्ही सीमेवर आतंकवादी कारवाया अन् गोळीबार करत राहू’, असेच पाकला अपेक्षित आहे !

इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांना पुढे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘चर्चा करणे’ हाच आहे, असे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका संमेलनात केले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी शांतीपूर्ण वातावरणासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक, तसेच लोकांचे हित साधले जाऊ शकेल.


Multi Language |Offline reading | PDF