‘विकीलिक्स’ संकेतस्थळाचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ब्रिटीश पोलिसांकडून अटक

गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती उघड केल्याचे प्रकरण

पॅरिस – गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती उघड केल्याच्या प्रकरणी ‘विकीलिक्स’ संकेतस्थळाचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ब्रिटीश पोलिसांनी इक्वेडोरच्या दूतावासातून अटक केली. असांजे यांनी वर्ष २०१० मध्ये अनेक राष्ट्रांशी निगडित गोपनीय आणि महत्त्वाची कागदपत्रे सार्वजनिक करून जगभरात खळबळ उडवून दिली होती. स्वतःची अटक टळावी म्हणून ते वर्ष २०१२ पासून इक्वाडोर येथील दुतावासात वास्तव्यास होते. १२ डिसेंबर २०१८ या दिवशी त्यांना इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते. इक्वाडोर सरकारने असांजे यांना दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर लंडन पोलिसांनी त्यांना अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF