काश्मीर कुणाच्या बापाचे नाही, हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे ! – एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी

सोलापूर – नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले, तर काश्मीरची समस्या दूर होईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. आमच्या देशातील निवडणुकीविषयी वक्तव्य करण्याची इम्रान खानची हिंमत कशी झाली ? इम्रान कितीही सांगत असला, तरी येथील वंचित समाज मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही. काश्मीर कुणाच्या बापाचे नाही, हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे. तो भारताचा भाग आहे आणि कायम भारताचाच भाग राहील, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. (ओवैसी यांचे विधान पहाता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची त्यांना भीती वाटते का ? – संपादक) ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ १० एप्रिल या दिवशी झालेल्या पार्क स्टेडियमवरील जाहीर सभेत बोलत होते.

ओवैसी पुढे म्हणाले की, पाकिस्तानात लष्कराच्या साहाय्याविना निवडणुका होत नाहीत; पण आज त्या देशाचा पंतप्रधान आणि लष्कर आमच्या देशातील निवडणुकीविषयी बोलत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF