साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

‘पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा !

१. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.

२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले.

ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.

३. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपपत्रात ‘कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएसनेच) आरडीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली’, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे.

या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना, यावर सतर्कतेने लक्ष ठेवा !’

  • ‘सनातनच्या आश्रमांत पोलीस येतील, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा’, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणांवरून लक्षात येईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now