जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडच्या पंतप्रधानांनी या घटनेसाठी संसदेत क्षमा मागितली

अशा घटना अक्षम्य असून त्याला कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे !

लंडन – जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेबद्दल आम्हाला पश्‍चात्ताप वाटतो, अशा शब्दांत इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटीश संसदेत १० एप्रिल या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी जाहीरपणे क्षमा मागितली.

लंडन

१३ एप्रिल १९१९ या बैसाखीच्या दिवशी पंजाबमधील जालियनवाला बागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिशांच्या विरोधात अनुमाने १५ ते २० सहस्र नागरिक जालियनवाला बागेत जमले होते. या वेळी ब्रिटीश अधिकारी जनरल रेगिनाल्ड डायर याने बागेतून बाहेर निघण्यासाठी असणारा एकमेव रस्ता बंद करून सैनिकांना नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.

या वेळी ५० सैनिकांनी १ सहस्र ६५० फैरी झाडल्या. यामध्ये १ सहस्र भारतीय नागरिक हुतात्मा झाले, तर १ सहस्र १०० जण घायाळ झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF