बामणोद (जळगाव) येथे प.पू. महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृतवाणीतून ‘हनुमान कथा’ !

जळगाव, ११ एप्रिल (वार्ता.) – बामणोद (जळगाव) येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री साई मित्र मंडळाच्या वतीने पी.एस्.एम्.एस्. शाळेच्या प्रांगणात श्रीराम भक्त ‘हनुमान कथे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा १२ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत होणार असून कथा प.पू. महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या अमृतवाणीतून सांगितली जाणार आहे. कथेची वेळ सायंकाळी ६.३० ते रात्री १०.३० अशी असणार आहे.

या काळात प्रतिदिन सकाळी ५.३० ते ७ या वेळेत काकड आरती आणि सायंकाळी ५ वाजता हरिपाठ होणार आहे. १८ एप्रिल या दिवशी रात्री ८ ते १०.३० या वेळेत ‘संत संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. १९ एप्रिल या दिवशी श्रद्धेय लखनजी महाराज यांचे सकाळी ९ ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद, तर दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत शोभायात्रा निघणार आहे. तरी या कथेचा पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान जयंती उत्सव समिती आणि बामणोद येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे. कथेचे थेट प्रक्षेपण Janardan Maharaj या यू ट्यूब चॅनेलवर पहाता येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF