सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांकडून वारंवार साधक आणि कार्यकर्ते यांची चौकशी करण्यात येत आहे अन् चौकशीच्या नावाखाली त्यांचा नाहक छळ केला जात आहे. साधक आणि कार्यकर्ते यांनी हा चौकशीचा वृत्तांत त्वरित ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयात पाठवावा.’

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते.

यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. ‘कर नाही, त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.


Multi Language |Offline reading | PDF