मंगळसूत्राचा फासा न काढता ते साधिकेच्या गळ्यातून आपोआप निघून अंथरुणावर पडण्यामागील कार्यकारणभाव

कु. मधुरा भोसले

‘२९.७.२०१७ या रात्री सौ. मंजिरी आगवेकर यांच्या गळ्यातील लहान मंगळसूत्र त्याचा फासा न काढता आपोआप त्यांच्या गळ्यातून निघून अंथरुणावर पडल्याचे त्यांना सकाळी लक्षात आले. एरव्ही हे मंगळसूत्र फासा काढल्याशिवाय गळ्यातून काढता येत नाही. त्यामागील कारण पुढीलप्रमाणे आहे.

१. विवाहित स्त्रीच्या संदर्भात मंगळसूत्राचे असणारे महत्त्व

विवाहित स्त्रीने मंगळसूत्र धारण केल्यामुळे मंगळसूत्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तिच्या अनाहतचक्रावाटे तिच्या देहात प्रवेश करते. त्यामुळे तिचा देह पवित्र होतो आणि तिच्या मनामध्ये धर्माचरण करण्याचे सात्त्विक विचार वृद्धींगत होतात. मंगळसूत्र धारण केल्यामुळे स्त्रीकडून पातिव्रत्य धर्माचे पालन चांगल्या रितीने होते.

२. पतीवर आधिभौतिक, आधिदैविक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे कोणतेही संकट येणार असले, तर त्याचे पडसाद मंगळसूत्रावर झाल्याचे दिसून येणे

मंगळसूत्र हे पति आणि पत्नी यांना विवाहाच्या पवित्र बंधनात बांधून ठेवणारे माध्यम, म्हणजे सूत्र आहे. हे सूत्र मंगलकारी असल्यामुळे त्याला ‘मंगळसूत्र’ म्हणतात. मंगळसूत्र हे सौभाग्याचा अलंकार असून त्यामुळे स्त्रीच्या सौभाग्याचे, म्हणजे पतीचे रक्षण होते. पतीवर आधिभौतिक, आधिदैविक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचे संकट येणार असले, तर त्याचे पडसाद मंगळसूत्रावर झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे मंगळसूत्र गळ्यातून निघून पडणे, मंगळसूत्र तुटणे किंवा मंगळसूत्र हरवणे यांसारख्या बुद्धीअगम्य घटना घडतात.

३. सौ. मंजिरी आगवेकर यांचे यजमान श्री. विनायक आगवेकर यांचे पाताळातील मोठ्या वाईट शक्तीच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मंगळसूत्रातील दैवी शक्ती कार्यरत होणे

सौ. मंजिरी आगवेकर यांच्या यजमानांवर ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तीने सूक्ष्मातून आक्रमण केले होते. या आक्रमणापासून श्री. विनायक आगवेकर यांचे रक्षण करण्यासाठी सौ. मंजिरी आगवेकर यांनी धारण केलेल्या मंगळसूत्रातील शिव आणि पार्वती यांची संयुक्त दैवी शक्ती कार्यरत झाली. सूक्ष्मातील या लढ्यात धर्माचा विजय झाला. त्यामुळे श्री. आगवेकर सुखरूप आहेत.

४. सौ. मंजिरी आगवेकर यांच्या गळ्यातून मंगळसूत्र आपोआप निघून पडण्यामागील कारण

मंगळसूत्रामुळे शिव आणि पार्वती यांच्या संयुक्त दैवी शक्तीमुळे वाईट शक्ती पराभूत झाल्या, त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी सौ. मंजिरी आगवेकर यांच्या गळ्यातून मंगळसूत्र काढून अंथरुणावर टाकले.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), ३०.७.२०१७, रात्री ११.२३

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.


Multi Language |Offline reading | PDF