ममता बॅनर्जी यांच्या सरकारला २० लाख रुपयांचा दंड !

राजकारणावर टीका असणार्‍या चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याचे प्रकरण

  • नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गळा काढणारे पुरो(अधो)गामी या वेळी गप्प का होते ? असे प्रदर्शन एखाद्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने रोखण्याचा प्रयत्न केला असता किंवा भाजप सरकारने केला असता, तर याच पुरो(अधो)गामी संघटनांनी आकाशपाताळ एक करण्याचा प्रयत्न केला असता !
  • सत्तेचा दुरुपयोग करणार्‍या अशा पक्षांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
  • हा दंड सरकारी तिजोरीतून नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या पैशांतून वसूल केला गेला पाहिजे ! त्यासाठी न्यायालयाने आदेश द्यायला हवा !

नवी देहली – बंगाली चित्रपट ‘भोविष्योतेर भूत’चे प्रदर्शन रोखल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. या चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपटगृहांचे मालक यांना हे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यावरून हा दंड ठोठावण्यात आला. ‘भोविष्योतेर भूत’ या चित्रपटातून राजकारणावर व्यंगात्मक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी तो रोखण्यात आला. ‘यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांच्या मालकांवर दबाव आणला होता’, असा आरोप या चित्रपटाच्या निर्मार्त्यांनी केला होता.


Multi Language |Offline reading | PDF