आंध्रप्रदेशमध्ये तेलुगू देसम् आणि वायएस्आर् काँग्रेस पार्टी पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीत एकाचा मृत्यू

  • हाणामारी करणारे कार्यकर्ते असणारे पक्ष कधीतरी कायदा आणि सुव्यवस्था राखतील का ?
  • मतदानकेंद्रात कार्यकर्त्यांमधील हाणामारीही रोखू न शकणारे पोलीस निवडणुकीच्या वेळी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यास, ते कधी रोखू शकतील का ?

भाग्यनगर – आंध्रप्रदेशातील नरसरावपेट मतदारसंघात तेलुगू देसम् आणि वायएस्आर् काँग्रेस पार्टी या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्रातच तुंबळ हाणामारी झाली. केंद्रात तैनात सुरक्षारक्षकांनी कार्यंकर्त्यांना पांगवले. त्याच वेळी पुतलपट्टू येथे झालेल्या दोन्ही पक्षांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. नरसरावपेटमध्ये झालेल्या हाणामारीची चित्रफीत सामाजिक प्रसारमाध्यमातून सर्वत्र प्रसारित झाली आहे. या मतदारसंघातील २१४, २१५ आणि २१६ या मतदानकेंद्रांवर हाणामारी झाली. त्यामुळे येथे पुन्हा मतदान घेण्याची मागणी तेलुगू देसम पक्षाने केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF