‘एअर स्ट्राईक’च्या ४३ दिवसांनंतर पाकने आंतरराष्ट्रीय माध्यमांना बालाकोट दाखवले !

अवघ्या २० मिनिटांत दौरा आटोपता घेतला !

  • ‘एअर स्ट्राईक’वर संशय घेणारे भारतातील राजकीय पक्षांचे नेते पाकच्या या कृतीविषयी पाकला प्रश्‍न विचारतील का ?
  • ‘एअर स्ट्राईक’ नंतर इतक्या दिवसांनी पाकने बालाकोट येथे प्रसारमाध्यमांना नेले, यावरून ‘पाकने आक्रमणात झालेली हानी लपवली’, हे स्पष्ट होते ! जर पाकला ‘येथे काहीच झाले नाही’, असे दाखवायचे असते, तर त्याने कारवाईच्या दुसर्‍याच दिवशी प्रसारमाध्यमांना तेथे नेले असते !

इस्लामाबाद – भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’च्या ४३ दिवसानंतर पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र अधिकारी यांना बालाकोट येथील मदरसा दाखवला. याशिवाय येथील परिसरही त्यांना दाखवण्यात आला. या सर्वांना एका हेलिकॉप्टरमधून बालाकोट येथे नेण्यात आलेे; मात्र हेलिकॉप्टर जेथे उतरले तेथून दीड घंटे जाबा टेकडी चढल्यावर ते सर्व जण मदरशांपर्यंत पोचले. (नागरी वस्तीपासून दूर आणि इतक्या दुर्गम ठिकाणी मदरसा कसा असू शकतो ? तेथे आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रच असले पाहिजे, जेणेकरून येथे सहजासहजी कोणीही पोचू शकणार नाही ! – संपादक) पाकच्या सैन्याने पत्रकार आणि अधिकारी यांना तेथे असलेला एक मोठा खड्डा दाखवला आणि ‘भारताने केलेल्या बॉम्बफेकीमुळे तो पडला’, असे सांगितले. या वेळी पाकचे सैन्य मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आले होते. (इतक्या सैनिकांची येथे काय आवश्यकता होती ? हे सैनिक पाकवरील संशयच सिद्ध करतात ! – संपादक)

१. या वेळी या मदरशांत १२ – १३ वर्षांची १५० मुले शिकत होती. हा दौरा केवळ २० मिनिटांचाच होता. प्रसारमाध्यमांना येथील छायाचित्रे घेण्याची अनुमती देण्यात आली होती, तसेच काही शिक्षकांशीही बोलण्याची अनुमती देण्यात आली होती; मात्र पत्रकारांना ‘स्थानिक नागरिकांशी अधिक वेळ बोलू नका’, असे निर्देश देण्यात आले होते. यानंतर पाकच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

२. या वेळी पत्रकारांनी गफूर यांना ‘येथे पत्रकारांना आणण्यास इतका उशीर का केलात ?’, असा प्रश्‍न विचारल्यावर गफूर म्हणाले, ‘‘घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती. त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही.’’ (थातूरमातूर उत्तर देऊन खोटे बोलण्याचा प्रयत्न सैन्याने केला, हेच यातून उघड होते ! – संपादक)

३. ‘पत्रकार जेव्हा स्थानिक नगारिकांशी बोलत होते, तेव्हा पाकिस्तानी सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष होते’, असे ‘बीबीसी’च्या पत्रकाराने सांगितले.

दीड मासानंतर पत्रकारांना बालाकोट दाखवणे, हेच बोलके आहे ! – भारत

‘बीबीसी’च्या वार्ताहरांनी भारतीय परराष्ट्र खात्याला याविषयी प्रतिक्रिया विचारली असता भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकार्‍यांनी सांगितले की, ‘एअर स्ट्राईक’च्या घटनेला तब्बल दीड मास उलटून गेल्यानंतर पत्रकारांना बालाकोटमध्ये नेणे आणि परिस्थिती दाखवणे, हेच बोलके आहे. आम्ही २६ फेब्रुवारीला दिलेल्या प्रत्युत्तरात आमचे लक्ष्य साध्य केले आहे. आतंकवादाला चोख उत्तर देण्यासाठी, तसेच निर्णायक कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे यातून दिसून आले आहे.’


Multi Language |Offline reading | PDF