चिकाटीने आणि परिपूर्ण सेवा करणार्‍या मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. कल्पना कार्येकर (वय ५३ वर्षे) !

सौ. कल्पना कार्येकर

१. ‘ती. अनंत आठवले (ती. भाऊकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) मुंबई येथे असतांना सौ. कार्येकर यांच्याकडे त्यांच्यासाठी जेवणाचा डबा पाठवण्याची सेवा होती. त्या नियमित आणि वेळेत डबा द्यायच्या. त्या ही सेवा उत्साहाने करायच्या.

२. काकू घरातील सर्व कामे करून नियमित सेवेला बाहेर पडतात. त्या एकही दिवस सेवेत खंड पडू देत नाहीत.

३. पूर्वी त्यांना लेखा सेवेतील अनेक गोष्टी जमत नव्हत्या. त्यांनी चिकाटीने सर्व गोष्टी शिकून घेतल्या. आता त्या सहजतेने लेखाची सेवा करतात.

४. त्या एखादी सेवा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित साधकाचा तळमळीने पाठपुरावा घेतात.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, दादर सेवाकेंद्र, मुंबई. (एप्रिल २०१९)

सौ. कल्पना कार्येकर यांची गुणवैशिष्ट्ये !

१. जवळीक साधणे

अ. ‘सौ. कल्पना कार्येकर वर्ष १९९७ पासून साधनेत आहेत. काकूंची केवळ साधकांशीच नाही, तर साधकांच्या कुटुंबियांशीही जवळीक आहे.

आ. सध्या त्यांच्याकडे जिल्हा स्तरावर सनातन प्रभात नियतकालिकांच्या संबंधित सेवा आहे. त्यांचा सेवेनिमित्त जिल्ह्यातील साधकांशी संपर्क होेतो. काकूंची या साधकांशी जवळीक आहे.

२. काकूंमधील सहजतेमुळे साधक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.

३. प्रेमभाव : ‘एखाद्या साधकाला बरे नाही’, असे समजल्यावर त्या नियोजित सेवेतून वेळ काढून आजारी साधकाला भेटतात.

४. इतरांना साहाय्य करणे : साधकाला वैयक्तिक किंवा सेवेत अडचण असल्यास ती सोडवण्यासाठी काकू मनापासून प्रयत्न करतात. त्या इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यासाठी स्वतः कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते.

‘साधकाला आध्यात्मिक त्रास होत आहे’, असे लक्षात आल्यास काकू संतांना विचारून त्या साधकाला नामजपादी आध्यात्मिक उपाय तत्परतेने सांगतात.

५. सेवेची तळमळ

अ. त्या प्रत्येक सेवा मनापासून आणि आनंदाने करतात. त्यांच्याकडे एकाच वेळी २ – ३ तातडीच्या सेवा आल्यास त्या ताण न घेता आनंदाने सेवा करतात.

आ. पावसाळ्याच्या दिवसांत त्या रहात असलेल्या वसाहतीत गुडघ्याच्या वर पाणी साचते. काकू त्या पाण्यातून चालत येऊन सेवा करतात.’

– सौ. मनाली नाईक, सी वूड, नवी मुंबई. (एप्रिल २०१९)


Multi Language |Offline reading | PDF