ईश्‍वरपूर येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विजय संकल्प सभा !

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), १० एप्रिल (वार्ता.) – गुरुवार, ११ एप्रिल या दिवशी हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्री. धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. ईश्‍वरपूर नगरपालिकेच्या खुले नाट्यगृहाच्या मैदानावर दुपारी ४ वाजता ही सभा होईल, अशी माहिती शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF