यवतमाळ जिल्ह्यात आतंकवादविरोधी पथकाकडून एकाला अटक

यवतमाळ – भ्रमणभाषवरून चिथावणीखोर, तसेच अश्‍लील लघुसंदेश पाठवल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने रमेश या तरुणाला ९ एप्रिलला अटक केली असून त्याची चौकशी चालू आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी येथील आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही घंट्यांचा कालावधी शिल्लक असतांना अशा लघुसंदेशांमुळेे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now