नागपूर येथील मंदिरांत चोर्‍या करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक ! 

२१ गुन्हे होईपर्यंत पोलीस झोपले होते काय ? गुन्हेगारांना गुन्हे करण्यास मोकळीक देणारी अशी निष्क्रीय पोलीस यंत्रणा हिंदु राष्ट्रात नसेल !

नागपूर – नागपूर, वर्धा यांसह ठिकठिकाणच्या मंदिरांत चोर्‍या करून दानपेटीतील रक्कम, तसेच मौल्यवान वस्तू पळवणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला ८ एप्रिलला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ठिकठिकाणच्या २१ चोर्‍यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. विविध २१ चोर्‍यांतील १ लाख ४७ सहस्र २४६ रुपयांचा  माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बनसोड हा चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याच्या मूर्ती, टीव्ही घरात सजवून ठेवत होता.

१. गेल्या काही दिवसांपासून शहरात मंदिरातील दानपेट्या फोडण्याचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी मंदिरात चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवले होते.

२. ५ एप्रिल या दिवशी पहाटे नबाबपुरा परिसरातील पातुरकर राममंदिराजवळ आरोपी बनसोड संशयास्पद अवस्थेत गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिसला. त्याला कह्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

३. पोलिसांनी त्याच्याजवळची पिशवी (बॅग) पडताळली असता त्यात चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य आढळले. तो ज्या मोटरसायकलवर होता ती मोटरसायकलही त्याने कारंजा येथून चोरून आणली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now