(म्हणे) ‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच शांततेवर चर्चा होऊ शकते !’ – इम्रान खान

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची नाचक्की झाल्यावर भारताशी संबंध सुधारणे त्याच्यासाठी अपरिहार्य आहे. त्यासाठी शांतीचर्चा होणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी अशा प्रकारची विधाने करत आहेत ! अशा कावेबाज शत्रूला टाळ्यावर आणण्यासाठी आक्रमक धोरणच अवलंबणे आवश्यक !

इस्लामाबाद – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ‘सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणे अशक्य आहे. ‘राजकीय पक्षांकडून टीका होईल’, या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना इम्रान खान पुढे म्हणाले की,

१. मला २ नरेंद्र मोदी पहायला मिळणार आहेत. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील. (‘भारताच्या पंतप्रधानांनी देशात निवडणूक जवळ आली; म्हणून पाकवर कारवाई केली’, असे चित्र पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगवायचे आहे ! अशा कावेबाज पाकला कोणतीही दयामाया न दाखवणे इष्ट ! – संपादक)

२. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर कोणतेही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही.

३. आतंकवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. (इम्रान खान यांनी असे कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी जगाला सत्य काय आहे, हे ठाऊक आहे ! – संपादक)

४. मसूद अझहरसंबंधी विचारले असता इम्रान खान म्हणाले की, तो भूमीगत झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही. (तो भूमीगत होईपर्यंत इम्रान खान यांचे सरकार झोपले होते का ? कि केवळ जगाला सांगण्यासाठी अशा थापा इम्रान खान मारत आहेत ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now