‘द ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधील एका बड्या कुटुंबाचा दबाव ! – दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचा आरोप

  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांचा काँग्रेसने कधी विरोध केला आहे का ?
  • माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची हत्या घडवून आणल्याचे आजही सांगितले जाते. असे असतांना तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याविषयीचे सत्य जगासमोर आणणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. ‘हे पाप जगासमोर येऊ नये; म्हणून काँग्रेस या चित्रपटाला विरोध करत आहे’, असे राष्ट्रप्रेमींना वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई – माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे रशियाच्या दौर्‍यावर असतांना त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला. त्यावर आधारित ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे; मात्र त्याचे प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधले मोठे कुटुंब दबाव टाकत आहे. यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांना शास्त्री यांच्या कुटुंबियांकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली, असा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी केला आहे.

अग्नीहोत्री म्हणाले की, काँग्रेस पक्षामधील एक मोठे कुटुंब शास्त्री कुटुंबियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध करत आहे. काँग्रेसमधील नेत्यांना या चित्रपटाची भीती वाटते. त्यामुळे शास्त्री कुटुंबियांना पुढे करून ते या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवू पहात आहे. मुंबईत या चित्रपटाचा विशेष प्रयोग ठेवण्यात आला होता. या वेळी शास्त्री कुटुंब उपस्थित होते. त्यांनी चित्रपट पाहिला, मग आता चित्रपटावर आक्षेप घेण्याचे कारण काय ? मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मी लढा देणार.

चित्रपटाविषयी माहिती

वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर रशियातील ताश्कंद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० जानेवारी १९६६ या दिवशी करार करण्यात आला. या वेळी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पाकचे अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षर्‍या केल्या. त्याच्या दुसर्‍याच दिवशी लालबहादूर शास्त्री यांचे तेथे अकस्मात निधन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडींचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF