उत्तरप्रदेशातील जिल्हा रुग्णालयात महिला पोलिसाला नसरीन आणि अन्य एका महिला रुग्णाकडून बेदम मारहाण

  • धर्मांध पुरुषांप्रमाणे हिंसाचार करणार्‍या धर्मांध महिला !
  • या असहिष्णुतेविषयी पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना महिला पोलिसावर हात उचलण्याचे धाडस कसे होते ?
  • २ महिला मारहाण करत असतांना त्यापासून स्वतःचे रक्षण करू न शकणार्‍या महिला पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील सीतापूर जिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या रिता नावाच्या एका महिला पोलिसाला नसरीन आणि अन्य एका महिलेने मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची घटना नुकतीच येथे घडली. या मारहाणीचा व्हीडिओ प्रसारित झाला आहे. पोलिसांनी २ महिलांना अटक केली आहे.

१. सकाळी रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रुग्णांची खूप गर्दी होती. त्या वेळी  नसरीन आणि अन्य एक महिला रांगेत उभ्या असलेल्या अन्य महिलांवर दरडावत होत्या.

२. यावर येथे तैनात असणार्‍या महिला पोलिसाने त्यांना जाब विचारल्यावर नसरीने पायातील चप्पल काढून तिला मारहाण करण्यास चालू केल्यावर दुसरी महिलाही तिला मारहाण करू लागली. तसेच त्या शिवीगाळही करत होत्या.

३. या वेळी काही जण मारहाण थांबवण्याऐवजी चित्रीकरण करत होते. (मारहाण थांबवण्याऐवजी चित्रीकरण करणार्‍यांना अटक करून कारागृहांत डांबले पाहिजे ! सरकारने आता यासाठी कायदाच बनवला पाहिजे ! – संपादक)

४. या मारहाणची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी रिता यांना वाचवले आणि नसरिन आणि अन्य एका महिलेला अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF