भारतात ‘गूगल पे’चा विनाअनुमती वापर चालू

देहली न्यायालयाकडून रिझर्व्ह बँकेला नोटीस

एवढ्या मोठ्या आस्थापनाचे ‘अ‍ॅप’ देशात चालू असून त्याद्वारे लक्षावधी लोक पैशाचे हस्तांतरण करत असतांना रिझर्व्ह बँक झोपा काढत आहे का ?

नवी देहली – भारतात विनाअनुमती गूगल पे’ कसे काय चालू आहे ? असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला विचारला आहे. न्यायालयाने रिझर्व्ह बँक आणि गुगल इंडिया यांना या संदर्भात नोटीसही पाठवली आहे.

२० मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत ‘पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स’च्या सूचीमध्ये ‘गूगल पे’चे नाव नाही. ही सूची समोर आल्यानंतर यासंदर्भात न्यायालयात एक जनहित याचिका प्रविष्ट झाली आहे. याचिकेत म्हटले आहे की, ‘गूगल पे’ पेमेंट कायद्याचे उल्लंघन करत असून भारतात या ‘अ‍ॅप’चा अवैध वापर केला जात आहे. ‘गूगल पे’ला बँकांकडून कोणतीही अधिकृत अनुमती देण्यात आलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF