राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फुटीरतावाद्यांसमवेत शोभत नाहीत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी असलेल्या पीडीपी पक्षासमवेत भाजप अनेक वर्षे सत्तेत होता, हे भाजपला शोभते का ?
  • सर्व राजकीय पक्षांचे ‘तत्त्वहीनता’ हेच प्रमुख तत्त्व बनले आहे. ही लोकशाहीची निरर्थकताच होय !

 

लातूर, ९ एप्रिल – ‘ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे, त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा करत नाही; पण शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती. शरद पवार, तुम्ही अशा लोकांसमवेत उभे आहात, हे तुम्हाला शोभते का ?’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यावर टीका केली. ते लातूर जिल्ह्यातील औसा येथील महायुतीच्या जाहीर सभेत बोलत होते. या वेळी नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा प्रारंभ मराठीतून केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की,

१. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही संकल्प केला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात येणार नाही’, असे काँग्रेस म्हणत आहे. काँग्रेसचे ढकोसलापत्र (जाहीरनामा) आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे. काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि पाकिस्तानलाही तेच हवे आहे. (शत्रूराष्ट्राची भाषा बोलणार्‍या पक्षाला देशावर ६० वर्षांहून अधिक काळ राज्य करू देणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक)

२. देशद्रोहाचे कलम हटवून काँग्रेस मानवतावादाच्या गप्पा मारत आहे; पण याच काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने आधी स्वत:ला आरशामध्ये पहावे आणि मगच मानवतावादाच्या गप्पा माराव्यात.

३. आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारणे, हीच नव्या भारताची नीती आहे. आतंकवादाचा नायनाट करणे, हा आमचा संकल्प आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रवाद्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्यात आला आहे. तेथे परिस्थिती सामान्य होत आहे. घुसखोरांची ओळख पटवण्यातही आम्ही यशस्वी झालो असून यापुढे आम्ही घुसखोरीला लगाम घालू.


Multi Language |Offline reading | PDF