धर्मांतराची गंभीर समस्या ओळखून राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा ! – शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अशी मागणी करावी लागणे भाजप सरकारला लज्जास्पद ! भाजप सरकार स्वतःहून धर्मांतरबंदी कायदा का करत नाही ?

मुंबई, ९ एप्रिल (वार्ता.) – राज्यात दिवसेंदिवस धर्मांतराची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. आर्थिक आमीष, प्रलोभने, भावनिक जाळे, बळजोरी आदी प्रयत्न करून गरीब आणि असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातही मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असून येथील परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की, ५ – ६ वर्षांत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी येथील दीड लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी नांदेड येथील शिवसेनेचे आमदार श्री. हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली.

या पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही धर्मांतराविषयी चिंता व्यक्त केली आहे. धर्मांतराचे हे प्रकार असेच चालू राहिले, तर उल्हासनगर येथील सिंधी समाज नामशेष होण्याची भीती आहे. उल्हासनगर शहर आणि आजूबाजूचा परिसर येथे १७ भव्य चर्च उभारण्यात आले असून ख्रिस्ती मिशनरी प्रार्थनेच्या नावाखाली तेथील हिंदु समाजातील विविध घटकांचे धर्मांतर करत आहेत. या धर्मांतराच्या विरोधात स्थानिक हिंदु त्यांच्या परीने जनजागृती करत आहेत; मात्र ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून पोलिसांत खोट्या तक्रारी प्रविष्ट करून त्यांना पोलीस कारवाईची भीती दाखवली जात आहे, अशी तक्रार येथील स्थानिक सिंधी बांधवांकडून करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF