गोमांस विक्रीच्या संशयावरून आसाममध्ये एकाला मारहाण करून डुकराचे मांस खायला लावले !

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार निष्क्रीय असल्यामुळे जमावाला अशा प्रकारचे कृत्य करावे लागत आहे ! सरकारने देशभरात गोमांसावर बंदी घालून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचा आदेश देऊन बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना जपल्या असत्या, तर देशात असे प्रकार घडले नसते !

गुवाहाटी (आसाम) – आसामच्या बिश्‍वनाथ चारीअली येथे गोमांसाच्या विक्रीच्या संशयावरून शौकत अली या ६८ वर्षीय व्यक्तीला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्याला डुकराचे मांस खायला लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. (अशा घटनांचे व्हिडिओ कसे प्रसारित होतात ? हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होतात, तेव्हा कोणी चित्रीकरण करत नाही कि धर्मांध ते करू देत नाहीत ? – संपादक)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत अली एका छोटा व्यावसायिक असून तो गेल्या ३५ वर्षांपासून या भागात एक भोजनालय चालवतो. हा जातीय हिंसाचार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. (पोलिसांनी असे म्हटले, तरी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि पुरो(अधो)गामी हिंदूंना तालिबानी आणि असहिष्णुच ठरवणार ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF