पुणे येथील वेदभवनच्या वतीने शत्रूच्या पराजयासाठी श्रीनगर येथे मन्युसूक्त जपानुष्ठान

डावीकडून श्री. मुकुंद चितळे, वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसासगुरुजी

पुणे, ९ एप्रिल (वार्ता.) – जम्मू-काश्मीरमधील अशांतता नष्ट व्हावी, तसेच सीमेवरील सैनिकांचे मनोधैर्य कायम रहावे, यासाठी वेदाचार्य श्री घैसासगुरुजी वेदपाठशाळेच्या (वेदभवन) वतीने शत्रूच्या पराजयासाठी श्रीनगरमध्ये मन्युसूक्त अनुष्ठान करण्याचे निश्‍चित केले आहे. ११ ते २० एप्रिल या कालावधीत श्रीनगरमधील जेष्ठमाता मंदिरात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती वेदाचार्य श्री घैसासगुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसासगुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वेदपाठशाळेचे विश्‍वस्त श्री. मुकुंदराव चितळे आणि विश्‍वेश्‍वर घैसास हेही उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. ऋग्वेदातील १४ मंत्रांच्या अनुष्ठानामुळे शत्रूचा पराजय होतो. अशा मन्युसूक्ताचा १४ सहस्र आवर्तनांचा जप, त्याचप्रमाणे १ सहस्र ४०० आवर्तनांचे हवन करण्याचा संकल्प करण्यात आला असून १२ ऋत्विजांना निमंत्रित करण्यात आले आहे.

वेदभवनाच्या माध्यमातून गेली ७३ वर्षे वेदांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य केले जात आहे. विविध शहरांमध्ये यज्ञ, तसेच व्याख्याने आयोजित करून लोकांच्या मनात वेदांप्रती निष्ठा आणि प्रेम जागृत करण्याचे काम करण्यात येते. नागरिकांनी निर्भय होऊन यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now