जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात संघ स्वयंसेवक आणि त्यांचे सुरक्षारक्षक ठार

किश्तवार (जम्मू-काश्मीर) – येथील जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चंद्रकांत शर्मा यांच्यावर ९ एप्रिलला दुपारी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते आणि त्यांचा सुरक्षारक्षक ठार झाले. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

चंद्रकांत शर्मा

चंद्रकांत शर्मा हे रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या सुरक्षारक्षकाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र यात हे दोघेही ठार झाले. गोळीबाराच्या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला. याचा अपलाभ घेत आक्रमण करणारे २ आतंकवादी पळून गेले. हे आतंकवादी बुरखा घालून आले होते. (अशा घटना रोखण्यासाठी तरी देशात बुरखाबंदी करायला हवी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF