दंतेवाडा (छत्तीसगड) येथील नक्षलवाद्यांच्या आक्रमणात भाजपचे आमदार ठार, तर ३ पोलीस हुतात्मा

  • जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात संघ स्वयंसेवक तर नक्षलवाद्यांच्या आक्रमणात भाजपचे आमदार ठार झाले, तरी भाजप आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, हे वास्तव आहे ! संघाने या ५ वर्षांत भाजप सरकारवर दबाव आणला असता, तर एव्हाना आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट झाला असता !
  • नक्षलवादी आणि आतंकवादी यांच्यापासून स्वतःच्या कार्यकर्त्यांचे  रक्षण करू न शकणारे शासनकर्ते हिंदूंचे रक्षण काय करणार ?  

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपचे आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या स्फोटात मंडवी आणि त्यांचा वाहनचालक यांचा मृत्यू झाला, तर ३ पोलीस हुतात्मा झाले.

भाजपचे आमदार भीमा मंडवी

आमदार भीमा मंडवी हे सभा आटोपून येत असतांना हा स्फोट घडवून आणण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF