शिरढोण, कळंबोली आणि कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

शोभायात्रेत स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवतांना कार्यकर्ते

पनवेल – येथील शिरढोण (जिल्हा रायगड) येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाल्या होत्या. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप करत साधक आणि धर्मप्रेमी या शोभायात्रेत सहभागी झालेे. या शोभायात्रेत धर्मशिक्षण देणारे फलक लावण्यात आले होते.

कळंबोली येथे गुढीपाडव्यानिमित्त ‘गुढीपाडवा सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्था कळंबोली’ या समितीच्या वतीने नववर्ष शोभयात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेतही सनातन संस्था आणि हिंदुजनजागृती समिती सहभागी झाली होती. सनातनचे श्री. अभिषेक मांढरे यांनी येथील सामूहिक गुढीचे पूजन केले. येथे दैनिक सनातन प्रभातच्या गुढीपाडवा विशेषांकाचे वितरण करण्यात आले, तसेच सनातनच्या ग्रंथांचेही वितरण करण्यात आले.

कामोठे येथे हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्था आणि हिंदुु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF