माझ्या कुटुंबाने अनेक पंतप्रधान दिले; पण मोदी यांनी देशाला सन्मान मिळवून दिला ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

नवी देहली – माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधान झाले आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो देशाला सन्मान मिळवून दिला, तो दीर्घ काळापासून कोणीही देशाला देऊ शकलो नव्हते. मोदी केवळ देशासाठी जगत असून देशासाठीच ते त्यांचे प्राण देतील. त्यांना केवळ देशाची चिंता आहे, असे विधान भाजपचे खासदार वरुण संजय गांधी यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

वरुण गांधी पुढे म्हणाले,

१. माझ्यावर भावना भडकवणारे भाषण दिल्याचे अनेक आरोप आहेत; मात्र सर्व प्रकरणांमध्ये मी विजय मिळवला आहे. तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारने औपचारिकरित्या माझी क्षमाही मागितली.

२. मी हिंदु आहे आणि माझ्या दिवसाचा प्रारंभ हनुमान चालिसाने होतो; पण माझ्या धर्माचे माझ्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही.

३. आतापर्यंत सुमारे १० लाख लोकांनी मी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे; पण असे काही नाही. मी एकाच नावेत स्वार होणारा व्यक्ती आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी मी भाजपात आलो होतो. जेव्हा मी पक्ष सोडेन, तेव्हा मी राजकीय संन्यास घेईन.’


Multi Language |Offline reading | PDF