रसलपूर (जळगाव) येथे २ धर्मांधांकडून गोमांसाची अवैधपणे वाहतूक

  • संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले !

  • पोलिसांकडून २ स्वतंत्र गुन्हे नोंद !

सर्रास होणार्‍या गोहत्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्यानेच नागरिकांचा उद्रेक होतो, असेच कोणालाही वाटेल !

जळगाव – रावेर तालुक्यातील रसलपूर येथून ब्रह्मपूरकडे (मध्यप्रदेश) अवैधपणे गोमांस घेऊन जात असतांना रस्त्यावर पडलेले गोमांस पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चारचाकी वाहन पेटवून दिले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून धर्मांध वाहनचालक शेख वसीम शेख इस्माईल आणि मालक शेख शकूर यांना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतुकीप्रकरणी ६ धर्मांध आणि वाहन पेटवल्याप्रकरणी २० ते २५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF