गोमांस निर्यातदारांशी केवळ मुसलमानच नव्हे, तर जैन आणि अन्य धर्मीयही जोडले आहेत ! – पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचा राज ठाकरे यांचा दावा

  • राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रफीत दाखवून हा आरोप केला आहे. याचे अजूनही भाजपने खंडण केलेले नाही अथवा स्वतःची बाजू मांडलेली नाही ! याचा अर्थ हिंदूंनी ‘हे वक्तव्य सत्य आहे’, असे समजायचे का ? 
  • गोमांस निर्यातीमध्ये भाजपच्या एका आमदारावरही आरोप झाला होता. मोदी सरकारने गोमांस निर्यात बंद केली नाही, यामागे हेही कारण आहे, असे आता हिंदूंनी समजायचे का ? सर्वच राजकीय पक्षांनी गोहत्या या सूत्राचा राजकीय लाभासाठी वापर केला. यामुळे भारतात गोहत्या थांबलेली नाही ! हिंदूंनी हे लक्षात घेऊन आता हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध व्हावे !

मुंबई – ६ एप्रिल या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका केली. या वेळी त्यांनी ‘गोमांस निर्यातीमध्ये केवळ मुसलमानच नव्हे, तर जैन आणि अन्य धर्माचे लोकही आहेत’, असे मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटल्याची चित्रफीतही दाखवली. त्यातून त्यांनी गोमांसावरून भाजप मुसलमानांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. (हिंदु धर्मशास्त्रानुसार गोहत्या पाप आहे. त्यामुळे ती हिंदूंनी केली काय किंवा धर्मांधांनी त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

१. राज ठाकरे यांनी देशातील विविध राज्यांमध्ये गायींची अवस्था कशी आहे, हे सांगितले. ते म्हणाले, ‘‘राजस्थानात ७० सहस्र गायी अन्न न मिळाल्याने मेल्या. छत्तीसगड २०० गायी मेल्या. गोहत्या, गोमांस, गोरक्षण यावरून जे काही चालू होते त्यावर आता मोदी काय म्हणतात ते बघा’’, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोदी यांची एक चित्रफीत दाखवली. (भाजपशासित राज्यांमधील गोशाळांमध्ये गायींचा मृत्यू झाला, हे यापूर्वीच उघड झाले होते. भाजपचे बेगडी गोप्रेम हे यावरून सिद्ध होते ! – संपादक)

२. राज ठाकरे पुढे म्हणाले की, गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून देशात शंभरपेक्षा अधिक जणांना जमावाने केलेल्या हिंसाचारात ठार केले गेले आहे. उत्तरप्रदेशात तर अशी घटना घडली की, गोमांस असल्याच्या संशयावरून एका माणसाला ठार केले, त्यानंतर समजले की, गोमांस नव्हते, तर मटण होते. मग त्या माणसाच्या मृत्यूला कोण उत्तरदायी आहे ? एवढेच नाही, तर सगळेजण गायी कापत असते, तर दूध कोणी दिले असते ? (असे वक्तव्य करणे म्हणजे गोद्रोही गोमांसनिर्यादार आणि धर्मांध यांच्या कुकृत्याला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न नव्हे का ? आता भारतात केवळ काही कोटी गोधन शिल्लक आहे, हे वास्तव आहे. गोहत्येच्या विरोधात काहीही न करणार्‍या भाजप सरकारवर टीका करणार्‍यांसह गोहत्या रोखण्यासाठीही प्रयत्न करणे अपेक्षित आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF