काँग्रेसपेक्षा मोदी सरकारने मुसलमानांना अधिक दिले !- भाजपच्या मुसलमान नेत्याची स्वीकृती

  • गेल्या ५ वर्षांत मोदी सरकारमधील एकतरी हिंदु मंत्री ‘मोदी सरकारने हिंदूंना काँग्रेसपेक्षा अधिक दिले’ असे म्हणू शकतो का ? नाही म्हणू शकणार; कारण मोदी सरकारने हिंदूंची उपेक्षा केली, हे लक्षात घ्या ! 
  • मोदी यांनी मुसलमानांना काँग्रेसपेक्षा अधिक दिले आणि हिंदूंना ठेंगा दाखवला, हे हिंदूंनी लक्षात घेऊन आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !

पुणे – गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने दिले, त्यापेक्षा अधिक मोदी सरकारने मुसलमान समाजाला दिले आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीयमंत्री शाहनवाज हुसेन यांनी येथे केले. ‘भाजप आणि मित्रपक्ष यांना मतदान करू नका’ या गिरीश कर्नाड, अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह यांच्यासह ६०० कलाकारांनी केलेल्या आवाहनाविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ कागदीपुरा आणि आझम कॅम्पस येथे ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हुसेन पुढे म्हणाले की, कलम ३७० हटवल्यास जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे होईल, अशी चेतावणी देणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांना ‘हे काही विवाहाचे नाते नाही’, हे समजायला हवे. भाजपचे कार्यकर्ते जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे होऊ देणार नाहीत. (काश्मीरला भारतीय सैन्य वेगळे होऊ देणार नाही; मात्र ‘काश्मीर हिंदूंचा कधी होणार?’, हा प्रश्‍न आहे. त्यासाठी भाजपने गेल्या ५ वर्षांत काहीच केले नाही ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF