महाराष्ट्रात हिंदु नववर्षारंभ उत्साहात साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन

मुंबई – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, यवतमाळ, भुसावळ, कोल्हापूर, सोलापूर आदी सर्वच लहान-मोठ्या शहारांमध्ये हिंदूंनी पारंपरिक वेशभूषेत, तसेच ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका काढत हिंदु नववर्षारंभाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांमध्ये मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजनाच्या कार्यक्रमांत हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि रणरागिणी शाखा या संघटना सहभागी झाल्या होत्या. तर काही ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी उपस्थित हिंदू आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.


Multi Language |Offline reading | PDF