(म्हणे) ‘नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे !’

  • काश्मिरी मुसलमानाशी निकाह करणार्‍या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी तोडलेले ‘चांदतारे’ !
  • तोंड असल्यामुळे काहीही बरळणार्‍या अशांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी !
  • काश्मीरमध्ये हिंदूंना त्यांच्या बायका आणि संपत्ती सोडून जाण्याच्या धमक्या मशिदींमधून देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले आणि सहस्रो हिंदूंना ठार करण्यात आले. विस्थापित हिंदू अजूनही काश्मीरमध्ये परतू शकलेले नाहीत, तेव्हा या हिंसक धर्माविषयी उर्मिला मातोंडकर तोंड का उघडत नाहीत ? कि काश्मिरी मुसलमानाशी निकाह केल्यामुळे त्यांना आता असे वाटू लागले आहे ?

मुंबई – जो हिंदु धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी ओळखला जात होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या काळात सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे, असे विधान अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. ‘मी काश्मिरी मुसलमानाशी विवाह केल्यानंतर हिंदु धर्म पालटलेला नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. (हिंदू हिंसक असते, तर उर्मिल मातोंडकर यांना असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमण करण्याचे कोणाचे धारिष्ट्य झाले असते का ? गोहत्या करण्याचे धाडस झाले असते का ?  हिंदूंचे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचे ख्रिस्ती मिशनरींचे धारिष्ट्य झाले असते का ? काँग्रेसला हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे धाडस झाले असते का ? – संपादक)

उर्मिला मातोंडकर पुढे म्हणाल्या की, भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव निर्माण झाला आहे. देश अराजकतेच्या दिशेने जात आहे आणि लोकांना हिंसा हाच एकमात्र मार्ग दिसत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now