अखिल मानवजातीला सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार्‍या सनातनच्या ग्रंथांच्या निर्मितीच्या धर्मसेवेत सहभागी होऊन मनुष्यजन्माचे सार्थक करा !

आगामी भीषण आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सनातनच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होण्याची विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मनुष्याचे अंतरंग घडवणारा आणि त्याच्या जीवनाला सुयोग्य दिशा देऊन त्याचे सर्वांगीण कल्याण साधणारा, तो ‘ग्रंथ’ ! संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, गोस्वामी तुलसीदास यांसारख्या अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून समाजकल्याणाचे महान कार्य केले. सध्याच्या काळात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी काळानुसार आवश्यक अशा विविधांगी ग्रंथांची निर्मिती सध्याच्या कलियुगातील पिढीला सहज आकलन होईल, अशा वैज्ञानिक परिभाषेत करत आहेत. सनातनच्या या बहुतेक ग्रंथांत पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले अद्वितीय असे ज्ञान आहे. ‘सनातनचा केवळ एक ग्रंथ वाचूनही साधक बनले’, असे केवळ भारतातीलच नव्हे, तर विदेशांतीलही कित्येक साधक आहेत. थोडक्यात केवळ एक ग्रंथही अनेक धर्मप्रसारकांचे कार्य करतो ! सनातनचे ग्रंथ वाचून अनेक साधकांना चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती येतात.

भूकंप, पूर, त्सुनामी, तिसरे महायुद्ध आदी संकटे घेऊन येणार्‍या आगामी भीषण आपत्काळाला लवकरच आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. अशा आपत्काळात सनातनकडे असलेले अमूल्य ज्ञान नष्ट झाले, तर मानवजातीची अपरिमित हानी होईल. नालंदा आणि तक्षशिला या विश्‍वविद्यालयांमधील असंख्य ग्रंथ नष्ट झाल्याने जसे हिंदू अमूल्य धर्मज्ञानाला सदाचेच मुकले, तसे आता आपल्याला होऊ द्यायचे नाही. यासाठी लवकरात लवकर अधिकाधिक ज्ञान जगात पोचवायचे आहे. ग्रंथसेवा ही सध्याच्या काळानुसार श्रेष्ठ अशी समष्टी साधनाच आहे. कोणतीही साधना काळानुसार केली, तर शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते. यासाठी ‘तुम्हीही ग्रंथसेवा करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यावे’, अशी नम्र विनंती !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ग्रंथनिर्मितीच्या कार्याची सध्याची स्थिती

अध्यात्म, धर्म, देवता, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आदी विषयांवर फेब्रुवारी २०१९ पर्यंत सनातनच्या ३११ ग्रंथ-लघुग्रंथांच्या १७ भाषांत (मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी आणि गुरुमुखी या ११ भारतीय भाषांत अन् नेपाळी, जर्मन, स्पॅनिश, सर्बियन, इंग्रजी आणि फ्रेंच या ६ विदेशी भाषांत) ७५ लाख ४० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता

२ अ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता

२ अ १. आगामी भीषण काळातील तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देेता येण्याच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून ‘भावी संकटकाळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेची निर्मिती चालू आहे. यात औषधी वनस्पतींची लागवड, बिंदूदाबन, नामजप-उपाय, अग्निहोत्र, प्रथमोपचार आदी १२ विषयांवरील सनातनचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अजूनही ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता’; ‘पूर, युद्ध आदी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?’; ‘औषधांविना आरोग्य मिळवा !’ आदी विषयांवरील ग्रंथांचे संकलन होणे शेष आहे.

२ अ २. तिसर्‍या महायुद्धाला लवकरच आरंभ होणार असल्यामुळे सनातनच्या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करून जगातील विविध देशांत ठेवायच्या आहेत. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धात नष्ट न झालेल्या काही धारिका नंतर मिळतील आणि ग्रंथ-प्रकाशनाचे कार्य मानवजातीसाठी महायुद्धानंतर पुढे चालू ठेवता येईल.

२ आ. घोर संकटकाळात जीवित रहाण्यासाठी प्रत्येकाने साधना करण्याच्या दृष्टीने ग्रंथांची निर्मिती होणे आवश्यक असणे : घोर संकटकाळात केवळ ईश्‍वरच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रत्येकाने साधना करणे अत्यावश्यक आहे. ग्रंथांच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे सोपे असते. त्यासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती होणे अजून शेष आहे. हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल.

२ आ १. विविध विषयांची आवड असणार्‍या जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध विषयांवरील शेकडो ग्रंथांचे संकलन होणे शेेष असणे

२ आ १ अ. आगामी ग्रंथांचे काही विषय : पुढीलपैकी काही विषयांवर सनातनचे थोडेफार ग्रंथ प्रकाशित झाले असले, तरी अजून अनेक ग्रंथ संकलित होणे शेष आहे.

२ आ १ अ १. साधना : साधना, व्यष्टी साधना, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, समष्टी साधना, क्षात्रधर्म साधना (तात्त्विक भाग), क्षात्रधर्म आणि राजधर्म, विविध योगमार्ग, आध्यात्मिक उन्नती

२ आ १ अ २. अध्यात्मशास्त्र : अध्यात्म, धर्म, विश्‍वाची निर्मिती, रचना आणि कार्य, भारत, मनुष्य, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन, साधक, शिष्य, गुरु

२ आ १ अ ३. देवता आणि अवतार : कनिष्ठ देवता, प्रमुख देवता, अवतार, ईश्‍वर, परमेश्‍वर

२ आ १ अ ४. धार्मिक कृती : सण, उत्सव आणि व्रते, सोळा संस्कार आणि इतर विधी, तांत्रिक विद्या (उपयोगी पडणारी)

२ आ १ अ ५. आचारधर्म : आदर्श दिनचर्या, केशरचना कशी असावी ?, कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?, स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र, सात्त्विक आणि असात्त्विक आहार, स्वयंपाकाच्या आचारांचे शास्त्र, भोजनापूर्वीचे आणि नंतरचे आचार, इतर आचार, विदेशातील आचार

२ आ १ अ ६. कुटुंब आणि बालसंस्कार मालिका : कुटुंब, बालसंस्कार मालिका, आदर्श पालक कसे बनावे ?

२ आ १ अ ७. भाषाविषयक : भाषा, ग्रंथ लिखाण, साहित्य

२ आ १ अ ८. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय : ईश्‍वरप्राप्तीसाठी कला (चित्र, मूर्ती, संगीत, नृत्य इत्यादी), ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र

२ आ १ अ ९. संत : वैशिष्ट्ये, कार्य, शिकवण

२ आ १ अ १०. प्रकटीकरण : आविष्कार (चांगल्या शक्तीचे प्रकटीकरण), वाईट शक्ती (प्रकटीकरण, अघोरी विधी, करणी)

२ आ २. ‘विविध धार्मिक विधी, देवतांचे विशिष्ट दिवस इत्यादींच्या वेळी सूक्ष्मातून काय घडते ?’, या संदर्भातील ग्रंथ छापणे शेष असणे : या ग्रंथांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व कळेल आणि ते साधनारत रहातील.

२ आ ३. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करण्यासाठी ग्रंथ आवश्यक असणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.

२ आ ४. हिंदुत्वनिष्ठ नियतकालिके, धर्मप्रसारक आणि साधनेविषयी मार्गदर्शक असलेली संकेतस्थळे, हिंदु संघटना आदींना धर्मप्रसारासाठी ग्रंथांतील लिखाण उपयुक्त ठरत असल्याने ग्रंथांचे संकलन होणे आवश्यक असणे

२ आ ५. सनातनचे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार असणे : सनातनचे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार असल्यामुळे त्यांचे संकलन होणे अत्यावश्यक आहे.

३. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होणे, ही मोठी समष्टी साधनाच आहे !

धर्मप्रसाराचे कार्य हे इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांच्या स्तरावर होऊ शकते. या तीन शक्तींपैकी ज्ञानशक्ती सर्वांत श्रेष्ठ आहे आणि तिचे कार्य निर्गुण स्तरावर चालते. सनातनचे ग्रंथकार्य हे ज्ञानशक्तीच्या स्तराचे कार्य आहे. यामुळे फारसा प्रसार न करताही समाज ग्रंथांतील ज्ञान वाचून साधना करण्यासाठी सनातनकडे स्वतःहून आकर्षित होत आहे. अशा या सनातनच्या ग्रंथशक्तीतूनच पुढे धर्माधिष्ठित ईश्‍वरी राज्याची स्थापना होणार आहे. थोडक्यात सनातनच्या ग्रंथांच्या निर्मितीच्या कार्यात सहभागी होणार्‍या व्यक्तींच्या हातून फार मोठी समष्टी साधना घडणार आहे. कालमहिम्यानुसार कलियुगात समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व आहे.

४. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांपैकी ३११ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती आतापर्यंत (फेब्रुवारी २०१९ पर्यंत) झाली असून अन्य ११ सहस्रांहून अधिक आध्यात्मिक विषयांवरील सुमारे ८ सहस्रांहून अधिक ग्रंंथांच्या निर्मितीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण पुढीलप्रमाणे हातभार लावू शकता.

४ अ. लिखाणाचे संगणकीय टंकलेखन करणे : संगणकावर मराठी टंकलेखन केल्यावर ‘सर्व लिखाणाचे टंकलेखन व्यवस्थित झाले आहे का ?’, हे मूळ लिखाणावरून पडताळणे

४ अ १. आवश्यक कौशल्य : संगणकावर मराठी टंकलेखन करता येणे, तसेच मराठी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे

४ आ. टंकलिखित लिखाणाचे संकलन करणे

४ आ १. सेवेचे स्वरूप

अ. विविध विषयांवरील प्रथम प्राधान्य असलेल्या ४,००० हून अधिक धारिकांचे संकलन करणे शेष आहे.

आ. द्वितीय प्राधान्याच्या ७,००० हून अधिक संगणकीय धारिकांचे प्राथमिक संकलन करणे शेष आहे. प्राथमिक संकलन करतांना लिखाणातील अनावश्यक भाग काढणे, त्यातील व्याकरण सुधारणे इत्यादी सेवा करायच्या असतात.

इ. द्वितीय प्राधान्याच्या १०,००० हून अधिक धारिकांचे अंतिम संकलन करणे शेष आहे. अंतिम संकलन करतांना लिखाणातील अनावश्यक भाग काढणे, परिच्छेद करून मथळे देणे, आवश्यकता असल्यास शिरोभाग लिहिणे, वाक्यरचना सुस्पष्ट करणे, भाषांतरित धारिका असल्यास भाषांतर योग्य असल्याची निश्‍चिती करणे इत्यादी सेवा करायच्या असतात.

४ आ २. आवश्यक कौशल्य : संगणकावर मराठी टंकलेखन करता येणे, तसेच मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे ज्ञान असणे

४ इ. लिखाणातील संस्कृत वचने, श्‍लोक आदी पडताळणे : ग्रंथांतील लिखाणात आलेले संस्कृत श्‍लोक, वचने आणि सुभाषिते पडताळणे; त्यांचा मूळ संदर्भ लिहिणे; त्यांचा अर्थ लिहिणे आदी सेवा यात अंतर्भूत आहेत. यासाठी साधकाला संस्कृत भाषेचे ज्ञान असावे.

४ ई. मराठी भाषेतील ग्रंथांचे संकलन करणे

४ ई १. विविध सेवा

अ. ज्या विषयावरील ग्रंथ करणार त्या विषयाच्या विविध सूत्रांच्या मथळ्यांवरून विषयाची अनुक्रमणिका सिद्ध करणे

आ. अनुक्रमणिकेनुसार लिखाण लावून त्या लिखाणाचे अंतिम संकलन करणे

इ. लिखाणावरून ‘ग्रंथांची किती पृष्ठे होतात’, हे पहाणे आणि पृष्ठसंख्येचा अंदाज घेऊन ग्रंथाचे २, ३… अशा भागांमध्ये ग्रंथाचे विभाजन करणे

ई. प्रत्येक भागाच्या अनुक्रमणिका आणि मनोगत सिद्ध करणे

उ. प्रत्येक भागाचे लिखाण अंतिम संकेतांक करण्यासाठी देणे

ऊ. प्रत्येक भागाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यांवरील लिखाण सिद्ध करणे

४ ई २. आवश्यक कौशल्य : ही सेवा करण्यासाठी मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे मराठी भाषेचे व्याकरण आणि ग्रंथसंकलनाची पद्धत शिकवणे सुलभ होईल.

‘ग्रंथनिर्मिती सेवे’प्रमाणेच कला, ध्वनीचित्रीकरण संहिता, तसेच ‘सनातन प्रभात’साठीही संकलनाची सेवा करू इच्छिणार्‍या साधकांसाठी सेवा उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार साधक सेवेची निवड करू शकतात.’

४ उ. विविध भाषांतील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची संगणकीय संरचना करणे, तसेच ग्रंथांत छापण्यासाठी सारण्या (टेबल) सिद्ध करणे : यासाठी ‘इन-डिझाईन’ या संगणकीय प्रणालीचे ज्ञान असावे.

४ ऊ. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषांतील ग्रंथांचे अन्य देश-विदेशी भाषांत भाषांतर करणे : ही सेवा करण्यासाठी ‘आपण ज्या भाषेत भाषांतर करू इच्छिता’, त्या भाषेचे व्याकरणदृष्ट्या उचित ज्ञान असणे आवश्यक आहे.

४ ए. लिखाणाला संकेतांक देणे आणि लिखाणाचे स्थलांतर (शिफ्टींग) करणे

४ ए १. विविध विषयांवरील ३४ सहस्रांहून अधिक धारिकांना संकेतांक (कोड) देणे : लिखाणातील वेगवेगळ्या बारकाव्यांनुसार त्यांना विशिष्ट संकेतांक दिले जातात आणि सर्व लिखाण संग्रही ठेवले जाते. संकेतांकांमुळे संग्रहात ठेवलेले लिखाण आवश्यकतेनुसार साठ्यातून शोधणे सोपे जाते.

४ ए २. प्रकाशित झालेल्या ४५ हून अधिक ग्रंथांचे संबंधित संकेतांकांमध्ये स्थलांतर करणे

५. ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा !

वरील सर्व सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. वर उल्लेखिलेल्या सेवा (सूत्र ‘४ ए २’ ही सेवा वगळता) सनातनच्या आश्रमात राहून वा घरी राहूनही करता येतील. घरी राहून सेवा करू इच्छिणार्‍यांनी काही दिवस आश्रमात येऊन सेवेतील बारकावे जाणून घेतल्यास घरी राहून सेवा करणे सुलभ होईल. या सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१


Multi Language |Offline reading | PDF