(म्हणे) ‘योग करतांना सूर्यनमस्कार घालत नसाल, तर चंद्रनमस्कार घाला !’

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा नाव न घेता मुसलमानांना सल्ला

  • योग हा हिंदु धर्मातील एक साधनामार्ग आहे आणि यातून आध्यात्मिक उन्नती करता येते; मात्र पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि हिंदुद्वेषी मंडळींच्या विरोधाला बळी पडून उपराष्ट्रपती असे विधान करत आहेत !
  • उपराष्ट्रपती यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व ठाऊक आहे का ? आणि योगसाधनेत ‘चंद्रनमस्कार’ असा काही प्रकार नसतांना ते कोणत्या अधिकाराने कोणाला असा सल्ला देत आहेत ?
  • भाजप सरकारने योगाचा प्रसार करण्याच्या नावाखाली त्यातील अध्यात्म काढून त्याला एक व्यायाम प्रकार करून टाकले आहे ! सरकारने हिंदुद्वेष्ट्यांचा सडेतोड प्रतिवाद करून सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले असते, तर केवळ सरकारच नव्हे, तर उपराष्ट्रपतींवरही असे बोलण्याची वेळ आली नसती !

लक्ष्मणपुरी – एकदा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘‘योग ठीक आहे; मात्र एक समस्या आहे. ती म्हणजे सूर्यनमस्कार.’’ मला तिची समस्या लक्षात आली आणि मी तिला सांगितले की, तुम्ही चंद्रनमस्कार घालत जा; पण योग करत जा. ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी पुष्कळच महत्त्वपूर्ण आहे. जगात सर्वत्र योग शिकवणारी केंद्रे उघडली जात आहेत; मात्र काही जण त्याला धर्माशी जोडू पहात आहेत, असे विचार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे मांडले. (योग हा हिंदु धर्माचा वारसा असतांना ते नाकारणारे व्यंकय्या नायडू स्वतःला अधिक ज्ञानी समजतात का ? – संपादक) ते येथील संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या एका वार्षिक बैठकीच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. या वेळी त्यांनी योगासनांचे महत्त्व विषद केले.


Multi Language |Offline reading | PDF