हिंदु विधीज्ञ परिषदेचे माहितीपत्रक आणि फलक उपलब्ध झाले असून त्यांचा धर्मप्रसारासाठी परिणामकारक उपयोग करा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

जून २०१२ मध्ये प्रथम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणार्‍या ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ची स्थापना करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून सर्वत्रचे अधिवक्ते, माहिती अधिकाराचा उपयोग करणारे कार्यकर्ते, न्यायालयीन क्षेत्रातील कर्मचारी आदींना राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्र-स्थापना यांच्या कार्यात सहभागी होण्याची, तसेच साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

या परिषदेमध्ये अधिकाधिक अधिवक्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी ‘ए ४’ आकारातील रंगीत १२ पानी माहितीपत्रक आणि ३ फूट × ४.५ फूट आकारातील ‘हिंदूंसाठी लढणारी वकिलांची संघटना – हिंदु विधीज्ञ परिषद’ आणि ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे ठळक यश !’ हे २ फलकही उपलब्ध करण्यात आले आहे. यातील ‘ठळक यश’ हा फलक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रेतर राज्य यांसाठी निरनिराळा बनवला आहे.

१. ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या माहिती पत्रकामध्ये काय आहे ?

अ. हिंदु विधीज्ञ परिषदेचे प्रेरणास्थान आणि स्थापना

आ. परिषदेच्या स्थापनेचे मुख्य उद्देश

इ. हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ यांच्यासाठी केलेले अमूल्य कार्य !

ई. शासन-अधिग्रहित मंदिरांतील भ्रष्टाचारविरोधी लढे !

उ. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांशी संबंधित यशस्वी लढे !

ऊ. हिंदु विधीज्ञ परिषदेने राष्ट्रहितासाठी दिलेले लढे !

ए. ‘माहितीचा अधिकार’ याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्य !

ऐ. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढे अन् त्यांतील सुयश !

ओ. सामाजिक आणि न्यायिक क्षेत्रांत केलेले महत्त्वपूर्ण कार्य !

औ. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा हिंदुत्वनिष्ठांकडून गौरव !

अं. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यात असेही सहभागी व्हा !

२. ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे पत्रक कसे वापरावे ?

हे पत्रक सर्वच अधिवक्त्यांना न देता, जे अधिवक्ते जिज्ञासू आहेत, ज्यांचा लोकसंग्रह चांगला आहे, अशांना देण्यासाठी करावा. या पत्रकाचा पुढील प्रकारेही उपयोग करावा.

अ. हे पत्रक अधिवक्त्यांच्या वैयक्तिक संपर्कांसाठी वापरता येईल.

आ. अधिवक्त्यांच्या स्थानिक संघटनांच्या उदा. ‘बार असोसिएशन’च्या प्रमुखांच्या भेटीच्या वेळी किंवा या संघटनांच्या बैठकांमध्येही या माहितीपत्रकाच्या आधारे अधिवक्त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य सांगण्यासाठी प्रयत्न करावेत.

३. ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या फलकाचा वापर कुठे करावा ?

हिंदु विधीज्ञ परिषदेचे फलक अधिवक्ता संघटनांची कार्यालये, न्यायालयांच्या आवाराच्या बाहेरील परिसर, तसेच मंदिरे, वाचनालये, सभागृहे आदी सुयोग्य ठिकाणी हे फलक संबंधितांची लेखी अनुमती घेऊन लावावेत.

या माध्यमातून सर्वत्रच्या अधिवक्त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या आणि समष्टी साधनेची अमूल्य संधी साधा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF