मनाच्या पाटावर रोवूया संकल्पाची गुढी ।

श्रीगुरुकृपेने पाडव्याच्या दिवशी (२८.३.२०१७), चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या मंगल दिनी प.पू. गुरुदेवांनी सुचवलेली कविता त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.

श्री. प्रणव मणेरीकर

मनाच्या पाटावर रोवूया संकल्पाची गुढी ।

हिंदु राष्ट्र त्यातूनी साकार होई ॥ १ ॥

विश्‍वाची उत्पत्ती झाली, तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा ।

हिंदु राष्ट्राचा शुभारंभही गुडीपाडवा ॥ २ ॥

अंतरंगी स्वप्न रामराज्याचे

साकार होईल ते गुरुकृपेने ॥ ३ ॥

समष्टी हे ध्येय अन् व्यष्टी साधना त्याचा पाया ।

करावा निश्‍चय प्रत्येकाने ॥ ४ ॥

अवतारी कार्य श्रीविष्णूचे ।

परम कृपेने आम्हा प्राप्त झाले ॥ ५ ॥

कृतज्ञता पुष्प आपण अर्पूया ।

चरणी त्यांच्या सदैव राहुया ॥ ६ ॥

– श्री. प्रणव मणेरीकर, देहली (२८.३.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF