‘गुढीपाडवा’ हाच आहे, हिंदु नववर्षारंभ ।

श्री. जयेश राणे

बहुतांश हिंदूंना वाटते ।

१ जानेवारीही आहे

आपला नववर्षारंभ ॥

म्हणून ते ‘हॅप्पी न्यू इयर’ म्हणत ।

साजरा करतात

तोही नववर्षारंभ ॥ १ ॥

बहुतांश मराठी जनांना गुढीपाडवा वाटतो ‘मराठी नववर्षारंभ’ ।

त्या दृष्टीने ते साजरा करतात हिंदु नववर्षारंभ ॥

अन् शुभेच्छा देतांना म्हणतात ।

हाच दिवस म्हणजे ‘मराठी नववर्षारंभ’ ॥ २ ॥

अनेक जण ‘हॅप्पी गुढीपाडवा’ म्हणत ।

साजरा करतात हिंदु नववर्षारंभ ॥

आता आपण मनावर बिंबवूया की ।

‘गुढीपाडवा’ हाच आहे, हिंदु नववर्षारंभ ॥ ३ ॥

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF