गुढीपाडव्यातील गूढत्व समजून घ्या !

परात्पर गुरु पांडे महाराज

वसंत ऋतूत आंब्याच्या मोहोराचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्याच्या जीवनाला आलेला हा बहर आहे. पुढे यालाच आंबे लागतात. ते परिपक्व झाल्यावर त्यात मधुर रस सिद्ध होऊन त्याचाही सुगंध सर्वत्र दरवळू लागतो आणि आम्हा सर्वांना आकर्षित करतो. या आदर्शाप्रमाणे आम्ही जीवन जगलो, तर आम्हाला आत्मानंद मिळेलच ! अशा जीवनाचा लाभ आम्ही समष्टी रूपाने ईश्‍वरी कार्याकरता दिला, तर सर्वांनाच त्याचा लाभ होऊन ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हायला हातभार लागेल ! यात सर्वांचेच कल्याण होईल आणि सर्वत्र शांतता अन् सुबत्ता राहील, तसेच दुष्ट आचार आणि विचार यांना थाराही रहाणार नाही. त्यामुळे सर्व वातावरण उत्तरायणातील वसंतऋतूप्रमाणे आनंदमय, आल्हादकारक आणि सुगंधमय राहील. याचा भगवंताला खरा आनंद होईल, जो आमच्यात वसला आहे, आमचे सूत्रसंचालन करतो आहे, आमच्या सुखासाठी झटत आहे, आमच्यासाठीच तो प्रकृतीरूपाने सर्वत्र नटला आहे. त्यातही त्याचेच अस्तित्व आहे. सर्वत्र तोच असून आम्हाला आनंद मिळावा; म्हणून तो कार्य करत आहे. तेव्हा आपण सर्वांनी गुढीपाडव्यातील हे गूढत्व समजून घ्यायचे आहे.

– (परात्पर गुरु) परशराम माधव पांडे (२४.३.२००६)


Multi Language |Offline reading | PDF